(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)
१८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि. नाशिक).
१८९२ मातृ निधन.
१८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.
१८९९ सप्टें ५ पितृनिधन.
१९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना.
१९०१ मार्च विवाह.
१९०१ डिसे.१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
१९०१ जाने.२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.
१९०४ मे. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.
१९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी.
१९०५ डिसे.२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
१९०६ जून ९ लंडनला प्रयाण.
१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.
१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.
१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.
१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.
१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.
१९०९ जून वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.
१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध.
१९०९ आक्टो.२४ लंडनमधे दसर्याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ.गांधी.
१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक.
१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी.
१९१० डिसे.२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.
१९११ जाने.३१ दुसर्या जन्मठेपेची शिक्षा.
१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.
१९२० नोव्हें. धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.
१९२१ मे.२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.
१९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.
१९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.
१९२४ जाने.६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.
१९२५ जाने.७ कन्या "प्रभात" हिचा जन्म.
१९२६ जाने.१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ 'श्रद्धानंद' साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा.
१९२७ मार्च १७ पुत्र "विश्वास" याचा जन्म.
१९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन
१९३१ फेब्रु.२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
१९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.
१९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.
१९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.
१९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ
नि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.
१९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.
१९३७ डिसे.३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.
१९३८ एप्रिल १५ 'महाराष्ट्र-साहित्य-संमेलन' २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.
१९३९ फेब्रु १ निजाम विरोधी 'भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार' प्रारंभ.
१९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.
१९४१ डिसे.२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.
१९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.
१९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.
१९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.
१९४५ मार्च १६ वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.
१९४५ एप्रिल १९ अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.
१९४५ मे ८ कन्या 'प्रभात' चा विवाह, पुणे.
१९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.
१९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.
१९४८ फेब्रु. ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.
१९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका.
१९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा. नारायणराव यांचे निधन.
१९४९ डिसे. अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.
१९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.
१९५२ मे १०-१२ 'अभिनव-भारत' संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.
१९५५ फेब्रु. रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.
१९५६ जुलै २३ लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.
१९५६ नोव्हें १० अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.
१९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.
१९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.
१९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने 'डी-लिट' सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली.
१९६० डिसें. २४ मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).
१९६१ जाने.१४ मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).
१९६२ एप्रिल १५ मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले.
१९६३ मे २९ मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई)
१९६३ नोव्हें ८ पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.
१९६४ आगस्ट १ मृत्युपत्र केले.
१९६४ आक्टो. भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.
१९६५ सप्टें गंभीर आजार.
१९६६ फेब्रु १ अन्न नि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ.
१९६६ फेब्रु २६ शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३
१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
मार्च १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालीयन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मेझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.
श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.
१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराप सावरकर यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रानी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.
वीर सावरकरांनीच पुढे दुसर्या महायुद्धाच्यावेळी जपान येथे जाउन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "आझाद हिंद फ़ौजेचे" सेनापतिपद भूषवावे अशी गळ घातली. त्यासाठी त्यांनी श्री रासबिहारी बोस यांचे पत्र नेताजींना दाखवुन सेनापतीची गरज पटवून दिली.पुढचा रोमहर्षक इतिहास सगळ्यांना माहीतच असेल.पण मुख्य प्रेरणा वीर सावरकरांचीच होती.
(source:http://www.savarkarsmarak.com/aboutsavarkar.php) Source - Pramod's MPSC /UPSC Portal
Submit your suggestion / comments / complaints / Takedown request on lookyp.com@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Railway Recruitment Cell (RRC) Allahabad has issue the application form for... [[ This is a content summary only. Visit my website for f...
-
Assistant Commissioner (Ward Officer), BMC,Mumbai Advt.No. 163/2011 Total Posts: 13 { ST Woman (if available)-1, VJ Woman (if available)-1, ...
-
India's batting is still in need of improvement, their coach Bharat Arun has said Source - Cricket news from ESPN Cricinfo.com Subm...
-
VVS Laxman is likely to soon bring the curtain down on his international career, with a key announcement expected within the next 24 hours ...
-
ह्युगो दि फ्रीस :चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासा...
-
GOP vice presidential candidate releases 2010 and 2011 returns; Paid 15.9 percent and 20 percent tax rates Source - Breaking News...
-
Being Alone Quotes Sayings For Girls, Being Alone Quotes For Girls, Being Alone Quotes For Boys,Alone Sayings Quotes,Alone Quotes For Girls ...
-
२०१० राष्ट्रकुल खेळ ३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भरवले जातील. हा एकोणीसावा ...
-
Eid SMS 2012,Eid Mubarak 2012 SMS, Eid Mubarak 2012 SMS Messages,Eid Mubarak Messages 2012, Eid Mubarak Messages.2012 Eid Mubarak SMS Messag...
-
Bhoop Singh, a jawan belonging to the 72 Armoured Regiment has committed suicide at Hisar, in Haryana. The jawan hung himself from a fan; he...
No comments:
Post a Comment