Wednesday, 15 August 2012

अर्थशास्त्र:economics for MPSC exam

जागतिक बँक-
जागतिक बँकेची (इंग्रजी: World Bank) स्थापना इ.स. २७ डिसेंबर १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्रजी: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थीक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. अविकसित देश व विकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले. गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आह.

जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकार्‍यांना प्रशिक्षण
अर्थव्यवस्थांचा विकास
भ्रष्टाचार निर्मुलन
गरीबी हटाव
संशोधन व शिक्षण
..
भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे. इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.
.
आर्थिक विकासदर:
आर्थिक विकासदर म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमधील सेवांच्या आणि उत्पादित मालाच्या मूल्याच्या वाढीचा दर होय. आर्थिक विकासदर साधारणपणे त्या अर्थव्यवस्थेच्या वार्षिक सकल उत्पन्नामधील वाढीच्या टक्केवारीच्या दरात मोजतात. हा दर चलनवाढीच्या दराला अनुरूप करून घेतात. अर्थात, सेवा व मालाच्या मूल्यामधून चलनवाढीचा परिणाम बाजूला काढून हा दर मोजतात. आर्थिक विकासदर हा सर्वसाधारणपणे एखाद्या देशामधील सरासरी राहणीमानामधील होणार्या सुधारणेचा दर्शक आहे .
चलनवाढ: महागाई मोजणाचं प्रमाण म्हणजे चलनवाढ. 
गुंतवणूकीचे प्रकार:(Types of Investments)
इक्विटी मार्केट
डेट मार्केट
बुलिअन मार्केट
रिअल इस्टेट
आर्ट(गुंतवणूक)
इन्शॉरन्स(गुंतवणूक)
प्रायव्हेट इक्विटी


म्युच्युअल फंड:
म्युच्युअल फंड(English:Mutual Fund) हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे ज्याचा वापर करून भारतीय गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतो संपत्ती निर्माण करणेसाठी समभाग निगडीत योजना, ज्यात शेअर बाजाराची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे निगडीत योजना ज्यात व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते व कर्जरोख्याशी निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जोखिम असते. 
.
मुदत ठेव:
मुदत ठेव (अन्य नावे: फिक्स्ड डिपॉझिट; इंग्लिश: Fixed Deposit Receipts, Time deposit ; ) ही एखाद्या बँकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली व मुदतीदरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव असते. मुदत संपल्यावर जमा केलेली रक्कम काढता येते अथवा पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते. मुदत ठेवीत सहसा अधिक मुदतीवर अधिक परतावा मिळतो..
समभाग:
समभाग (English:Shares/Stocks) कंपनीच्या एकूण भांडवलाच्या एककांना समभाग (Share) किंवा रोखे असे म्हणतात. समभाग हा कंपनीच्या मालकीचाच एक भाग असतो.समभागाच्या मालकाला भागधारक(ShareHolder) म्हणतात.

पुनर्गुंतवणूक(Reinvestment) न करण्यात आलेला नफा(Profit) हा लाभांश(Dividend) म्हणून गुंतवणूकदारांना(Investor) दिला जातो.
 

विक्री कर:
विक्री कर हा विकल्या जाणार्‍या वस्तूवर विकण्याच्या वेळी (Point of sale) लावला जाणारा कर आहे .

वार्षिक सकल उत्पन्न:
वार्षिक सकल उत्पन्न/राष्ट्रीय सकल उत्पन्न ही राष्ट्रीय आर्थिक स्थितीचे गणन करणारी महत्वाची आर्थिक मोजपट्टी आहे. वार्षिक सकल उत्पन्न दिलेल्या प्रादेशिक क्षेत्रात दिलेल्या कालावधीत झालेल्या उत्पादनांचे आणि सेवांचे मूल्य होय.

वार्षिक सकल उत्पन्न = उपभोगीता + गुंतवणूक + शासकीय खर्च + (निर्यात - आयात)
 


 







 
Source - Pramod's MPSC /UPSC Portal



Submit your suggestion / comments / complaints / Takedown request on lookyp.com@gmail.com

No comments:

Post a Comment

Popular Posts