Wednesday, 15 August 2012

भारतीय प्रमाणवेळ

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायी आहे. ही वेळ अलाहाबाद वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२ च्या चीन युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्ये असा बदल करण्यात आला होता.

ही वेळ ८२.५° पुर्व या रेखांशावरुन नियोजित आहे. साधारपणे अलाहाबाद जवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि युनायटेड किंग्डममधील रॉयल ऑब्जरवेटरी (ग्रीनवीच) यांच्यात रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. Source - Pramod's MPSC /UPSC Portal



Submit your suggestion / comments / complaints / Takedown request on lookyp.com@gmail.com

No comments:

Post a Comment

Popular Posts