Wednesday, 15 August 2012

२०१० राष्ट्रकुल खेळ


२०१० राष्ट्रकुल खेळ ३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भरवले जातील. हा एकोणीसावा राष्ट्रकुल क्रिडास्पर्धा सोहळा आहे. अठरावा सोहळा ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे २००६ मध्ये पार पडला होता. दिल्लीने यापूर्वी १९५१ आणि १९८२ मध्ये आशियाई क्रिडास्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे. या शहरात होणारा हा आतापर्यंतचा बहुक्रिडा सोहळा असेल. भारतात राष्ट्रकुल क्रिडास्पर्धा प्रथमच तर आशिया खंडात त्या होण्याची ही दुसरी वेळ आहे.

नोव्हेंबर २००३ मध्ये राष्ट्रकुल क्रिडास्पर्धा महासंघाच्या जमैकामध्ये झालेल्या बैठकीत २०१०च्या क्रिडास्पर्धा भारतात घेण्याला मतदानाने मंजुरी देण्यात आली. यात कॅनडामधील हॅमिल्टन हे दिल्लीला एकमेव स्पर्धक शहर होते.
२०१० राष्ट्रकुल खेळात १७ खेळ प्रकारात स्पर्धा झाल्या.
भारत:पदक तक्ता:    ३८       २७         ३६             १०१
                                 सुवर्ण    रौप्य    कांस्य    एकूण 
यजमान शहर    दिल्ली, भारत
मोटो                कम आउट अँड प्ले
सहभागी देश    ७१ राष्ट्रकुल संघ
सहभागी खेळाडू ६०८१
स्पर्धा            २६०          स्पर्धा १७ प्रकार
स्वागत समारोह ३ ऑक्टोबर
सांगता समारोह ३ ऑक्टोबर
अधिकृत उद्घाटक    प्रिंस चार्ल्स, प्रिंस ऑफ वेल्स व
प्रतिभा पाटील, भारतीय राष्ट्रपती
मुख्य मैदान   जवाहरलाल नेहरू स्टेडियम
संकेतस्थळ   cwgdelhi2010.org
Source - Pramod's MPSC /UPSC Portal



Submit your suggestion / comments / complaints / Takedown request on lookyp.com@gmail.com

No comments:

Post a Comment

Popular Posts