ज्ञानपीठ पुरस्कार:-
देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार ओळखला जातो.ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाक्देवीची प्रतीमा' आणि 'पाच लाख रुपयांचा धनादेश' ईत्यादिंचा समावेश असत
ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय शासनातर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिल्या जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६१ साली या पुरस्काराची अधिकृत घोषणा झाली आणि इ.स. १९६५ साली प्रसिद्ध मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले. आजपर्यंत सर्वाधिक वेळा पुरस्कार मिळाविण्याचा मान सात वेळा कन्नड आणि सहा वेळा हिंदी साहित्यिकांना मिळाला आहे. मराठी साहित्यिकांना तीन वेळा ह्या बहुमानाचा लाभ झाला असून विष्णू वामन शिरवाडकर, गोविंद विनायक करंदीकर आणि विष्णु सखाराम खांडेकर हे पुरस्कारविजेते मराठी साहित्यिक होय.
इ.स. २००० इंदिरा गोस्वामी - आसामी
इ.स. २००१ राजेंद्र केशवलाल शाह - गुजराती
इ.स. २००२ दंडपाणी जयकांतन - तमिळ
इ.स. २००३ विंदा करंदीकर- अष्टदर्शने मराठी
इ.स. २००६ रवींद्र केळेकर - कोकण
जनस्थान पुरस्कार:-
जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.कविश्रेष्ठ श्री वि.वा. शिरवाडकरांनी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानीत करण्यास सुरूवात केली.
आता हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जात.
पुरस्कार प्राप्त साहित्यीक:
२००९: ना.धों. महानोर
२००७: बाबूराव बागूल
२००५: नारायण सुर्वे
२००३: मंगेश पाडगावकर
२००१: श्री.ना. पेंडसे
१९९९: व्यंकटेश माडगूळकर
१९९७: गंगाधर गाडगीळ
१९९५: इंदिरा संत
१९९३: विंदा करंदीकर
१९९१: विजय तेंडुलकर
तन्वीर सन्मान:-
डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने "तन्वीर सन्मान' हा पुरस्कार दिला जातो. ९ डिसेंबर इ.स. २००८ मध्ये पं. सत्यदेव दुबे यांना दिला गेला.
या शिवाय पुरस्काराच्या 'तन्वीर रंगधर्मी' हा पुरस्कारही दिला जातो. ९ डिसेंबर इ.स. २००८मध्ये हा पुरस्कार अभिनेता गजानन परांजपे यांना दिला गेला
साहित्य अकादमी पुरस्कार:-
साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्यांना विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
इ.स.२००८ साल चा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना "उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरी साठी मिळाला.साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्यांना विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
आसामी, बंगाली, बोडो, डोग्री, इंग्लीश, गुजराथी, हिंदी, कन्नड, कश्मिरी, कोंकणी, मैथीली, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, व उर्दू
मराठीतील पुरस्कार विजेते:-
२००० – ना.धों. महानोर – 'पानझड'
२००१ – राजन गवस – 'टणकट'
२००२ – महेश एलकुंचवार – 'युगांत'
२००३ – त्र्यंबक विनायक सरदेशमुख – 'डांगोरा एका नगरीचा'
२००४ - सदानंद देशमुख - 'बारोमास'
२००५ - अरूण कोलटकर - भिजकी वही
२००६ - आशा बगे - भूमी
२००७ - जि. एम. पवार - विठ्ठल रामजी शिंदे: जिवन व कार्य
२००८ - श्याम मनोहर - 'उत्सुकतेने मी झोपलो'
२००९ - वसंत आबाजी डहाके - 'चित्रलिपी' काव्यसंग्रह.
कलिंग पुरस्कार:
कलिंग पुरस्कार हा ओरिसा सरकारच्या वतीने युनेस्को द्वारा दिला जातो.
सामान्य व्यक्तींना विज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी काम करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो
पद्मविभूषण पुरस्कार:-
द्मविभूषण हा भारतातील दुसर्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.
जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणार्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगीत करण्यात आला होता.
सुरुवातीच्या काळात १.३७५ इंच व्यासाचे गोलाकार सुवर्णपदक पद्मविभूषण पुरस्कारासाठी तयार करण्यात आले होते. त्यावर मधोमध उठावाचे नक्षीकाम केलेले कमळ, पद्मविभूषण अशी अक्षरे आणि खालच्या बाजूला कमळाच्या फुलांचे चक्र होते. दुसर्या बाजूस सरकारी राजमुद्रा, देश सेवा अशी कोरलेली अक्षरे आणि कमळाच्या फुलांचे चक्र होते. पण अशा पदकाची फक्त नोंद सापडते ती कुणाला प्रदान करण्यात आल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.
लगेचच दुसर्या वर्षी, म्हणजे १९५५ साली या पदकाचं स्वरुप बदलण्यात आलं. सोन्याऐवजी कांस्य धातूच्या १.१८७५ इंच व्यासाचे साधारण गोलाकार पदक तयार करण्यात आले. पदकाच्या एका बाजूला उठावदार कमळ कोरण्यात आले. त्याच्या समोरच्या चार पाकळ्या पांढर्या सोन्याने (सोने आणि निकेल किंवा सोने आणि पॅलाडियम धातूंपासून बनविलेला मिश्र धातू) मढविल्या गेल्या. वरच्या आणि खालच्या बाजूस चांदीचा मुलामा असलेली अनुक्रमे पद्म आणि विभूषण अशी अक्षरे कोरली केली. १९५५ पासून १९५७ पर्यंत ही अशी पदके वितरित करण्यात आली. त्यानंतर १९५८ सालापासून आजपर्यंत याच्या स्वरुपामध्ये ब्रॉन्झच्या धातूतील थोडा केलेला बदल वगळता कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पदकाच्या वरच्या बाजूला फिक्या गुलाबी रंगाची रिबन लावलेली असते.
सन २०१० पर्यंत एकूण २६४ थोर व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे दिल्लीच्या खालोखाल महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या किंवा महाराष्ट्र भूमी ही कार्यक्षेत्र असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
महाराष्ट्रातील पद्मविभूषणप्राप्त महान विभूतींची संख्या ४९ आहे, तर ५० दिल्लीवासियांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे
पुरस्कार विजेते:-
२००९ चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव नागरी सेवा महाराष्ट्र भारत
२००९ सुंदरलाल बहुगुणा पर्यावरण संरक्षण उत्तराखंड भारत
२००९ डी.पी. चट्टोपाध्याय साहित्य व शिक्षण पश्चिम बंगाल भारत
२००९ जसबीरसिंग बजाज वैद्यकशास्त्र पंजाब भारत
२००९ पुरुषोत्तम लाल वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
२००९ गोविंद नारायण सार्वजनिक कार्य उत्तर प्रदेश भारत
२००९ अनिल काकोडकर विज्ञान व तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
२००९ जी.माधवन नायर विज्ञान व तंत्रज्ञान कर्नाटक भारत
२००९ सिस्टर निर्मला सामाजिक कार्य पश्चिम बंगाल भारत
२००९ ए.एस. गांगुली व्यापार व उद्योग महाराष्ट्र भारत
प्रथम पुरस्कारविजेते सत्येन्द्र नाथ बसु
(source:http://mr.wikipedia.org) Source - Pramod's MPSC /UPSC Portal
Submit your suggestion / comments / complaints / Takedown request on lookyp.com@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Railway Recruitment Cell (RRC) Allahabad has issue the application form for... [[ This is a content summary only. Visit my website for f...
-
Assistant Commissioner (Ward Officer), BMC,Mumbai Advt.No. 163/2011 Total Posts: 13 { ST Woman (if available)-1, VJ Woman (if available)-1, ...
-
India's batting is still in need of improvement, their coach Bharat Arun has said Source - Cricket news from ESPN Cricinfo.com Subm...
-
VVS Laxman is likely to soon bring the curtain down on his international career, with a key announcement expected within the next 24 hours ...
-
ह्युगो दि फ्रीस :चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासा...
-
GOP vice presidential candidate releases 2010 and 2011 returns; Paid 15.9 percent and 20 percent tax rates Source - Breaking News...
-
Being Alone Quotes Sayings For Girls, Being Alone Quotes For Girls, Being Alone Quotes For Boys,Alone Sayings Quotes,Alone Quotes For Girls ...
-
२०१० राष्ट्रकुल खेळ ३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भरवले जातील. हा एकोणीसावा ...
-
Eid SMS 2012,Eid Mubarak 2012 SMS, Eid Mubarak 2012 SMS Messages,Eid Mubarak Messages 2012, Eid Mubarak Messages.2012 Eid Mubarak SMS Messag...
-
Bhoop Singh, a jawan belonging to the 72 Armoured Regiment has committed suicide at Hisar, in Haryana. The jawan hung himself from a fan; he...
No comments:
Post a Comment